चिकुर्डेत जपलं ‘नातं रक्ताचं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:15+5:302021-07-17T04:21:15+5:30
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे शशिकांत पाटील यांनी रक्तदान शिबराचे उद्घाटन केले. यावेळी अभिजित पाटील, बबन कचरे, सरपंच कमल पांढरे, ...

चिकुर्डेत जपलं ‘नातं रक्ताचं’
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे शशिकांत पाटील यांनी रक्तदान शिबराचे उद्घाटन केले. यावेळी अभिजित पाटील, बबन कचरे, सरपंच कमल पांढरे, उपसरपंच उत्तम पाटील, मोहन पाटील, कृष्णात पवार आदी उपस्थित होते.
ऐतवडे बुद्रुक : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमाअंतर्गत चिकुर्डे (ता. वाळवा) येथे रक्तदान शिबिरात ४२ जणांनी रक्तदान केले.
‘लोकमत’, ग्रामपंचायत व कर्मवीर वधू-वर सूचक केंद्रातर्फे आयोजन केले होते. शिवसेना नेते अभिजित पाटील, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस कार्यालयीन संघटनेचे राज्य अध्यक्ष बबन कचरे यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. येथील वारणा सिंचन सभागृहात शिबिर पार पडले.
यावेळी सरपंच कमल पांढरे, उपसरपंच उत्तम पाटील, ग्रामविकास अधिकारी मोहन पाटील, माजी सरपंच कृष्णात पवार, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, देवर्डेचे उपसरपंच संजय पाटील, करंजवडेच्या दत्त उद्योग समूहाचे संस्थापक दिनकर धोडी पाटील, राहुल डोईजड, बाबासाहेब खोत, डी. एम. पाटील, राहुल पाटील, सुवर्णरूपा पाटील, शिवसेना विभागप्रमुख महादेव तिवले, रमेश डावकरे उपस्थित होते. डी. एम. पाटील यांनी स्वागत केले. शंकर शिंदे यांनी आभार मानले.
चौकट
शशिकांत पाटील यांचे ५१ वेळा रक्तदान
राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी रक्तदान करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यांनी यापूर्वी ५० वेळा रक्तदान केले आहे.
चाैकट
यांनी केले रक्तदान...
शशिकांत पाटील, मोहन पाटील, विजय गायकवाड, प्रतीक पाटील, महादेव तिवले, अमर खोत, तुषार पाटील, सुहास ताटे, किशोर जाधव, सुधीर कांबळे, संजय मोरे, संजय सातवेकर, महादेव मलगुंडे, मोहन पाटील, संतोष परीट, रामचंद्र घारगे, दीपक गायकवाड, अंकुश गायकवाड, संदीप गायकवाड, कृष्णात पाटील, ओमकार खोत, राजकुमार पाटील, प्रेमकुमार तोडकर, राहुल डिंगणे, राजेंद्र कदम, दिग्विजय माने, प्रशांत पाटील, सूरज पठाण, अमोल कांबळे, गौरव कांबळे, तोफिक पठाण, अमोल गायकवाड, वैभव माने, संदीप पवार, इंद्रजित पाटील, तुषार पाटील, गणेश मलगुंडे, प्रशांत पवार, दिनेश भंडारे, बजरंग पाटील, प्रकाश खोत, प्रकाश पाटील, सौ. सोनल जंगम.