एन. एस. पाटील यांना सांगलीत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:25 IST2021-03-20T04:25:21+5:302021-03-20T04:25:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सहकारातील ज्येष्ठ विचारवंत एन. एस. पाटील यांना १७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. बसरगी ...

N. S. Greetings to Patil in Sangli | एन. एस. पाटील यांना सांगलीत अभिवादन

एन. एस. पाटील यांना सांगलीत अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सहकारातील ज्येष्ठ विचारवंत एन. एस. पाटील यांना १७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. बसरगी (ता. जत) येथे व इतर विविध सहकारी संस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

सांगलीतील मोहनराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेत अभिवादन कार्यक्रम झाला. यासह टिंबर मर्चंट नागरी पतसंस्थेतही अध्यक्ष यशवंत माळी, राजू लाले यांनी प्रतिमापूजन केले. ग्रामीण भागात सहकारी संस्था निर्माण करण्यात पाटील यांचे योगदान महत्त्वाचे होते, असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले. एन. एस. पाटील यांचा सहकारातील कार्याचा आदर्श यापुढेही चालू ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचेही मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

यावेळी राज्य सहकारी संघाचे संचालक व संस्थेचे अध्यक्ष एन. एम. हुल्याळकर, शरद गुरव, उमेश मदभावे, शशिधर हुल्याळ, स्नेहा सचिन कुलकर्णी, उज्ज्वला आरवाडे, संजय बिरादार, श्रीकांत लांजेकर यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.

Web Title: N. S. Greetings to Patil in Sangli