शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जयंतरावांच्या पोस्टरवरून ‘एन. ए.’ हद्दपार, हल्लाबोल आंदोलनाच्या पोस्टरची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:24 IST

इस्लामपूर : शहरात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या एन. ए. गु्रपचा दबदबा आता कमी झाला आहे. आघाडी शासनात मंत्री असताना जयंत पाटील यांनी या गु्रपला मोठी ताकद दिली होती. गांधी चौकात जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला एन. ए. गु्रप गगनचुंबी डिजिटल उभे करत होता. आता मात्र अलीकडील काही वर्षात ...

ठळक मुद्दे गांधी चौकातील राजकारण रंगले

इस्लामपूर : शहरात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या एन. ए. गु्रपचा दबदबा आता कमी झाला आहे. आघाडी शासनात मंत्री असताना जयंत पाटील यांनी या गु्रपला मोठी ताकद दिली होती. गांधी चौकात जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला एन. ए. गु्रप गगनचुंबी डिजिटल उभे करत होता. आता मात्र अलीकडील काही वर्षात एन. ए. गु्रपची ताकद कमकुवत झाली असून, गांधी चौकातील पोस्टरवरही या गु्रपला स्थान नाही. आता त्यांची जागा इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतली आहे.

इस्लामपूर शहराच्या राजकारणात एन. ए. गु्रपला अनन्यसाधारण महत्त्व होते. नाना-आबा यांच्या जोडीने पालिका निवडणुकीसह सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतून नाव केले होते. शहराची शान असलेल्या गांधी चौकातील ठरलेल्या ठिकाणी दरवर्षी जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भले मोठे डिजिटल गु्रपतर्फे उभारले जायचे. ते पुढच्या वाढदिवसालाच उतरवले जात होते. त्यांच्या ठरलेल्या जागेवर अथवा त्या कडेला कोणीही दुसरे डिजिटल लावायचे नाही, असाच अलिखित करार होता. परंतु जाधव बंधू खून प्रकरणात एन. ए. गु्रपचे जयवंत पाटील (आबा) अडकल्याने या गु्रपला उतरती कळा लागली. त्यानंतर खंडेराव जाधव (नाना) यांनी या गु्रपला सावरण्याचा प्रयत्न केला. एन. ए. गु्रपला थोडे मागे ठेवत त्यांनी एन. ए. परिवाराची संकल्पना पुढे आणली. यातून अनेक उपक्रम राबविले. गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. परंतु पालिका निवडणुकीनंतर एन. ए. परिवारही सक्रिय नसल्याचे दिसते.फलकावरून नाव हटविलेहल्लाबोल सभेसाठी गांधी चौकात उभारण्यात आलेल्या डिजिटलवरूनही या गु्रपचे नाव काढण्यात आले आहे. आता खंडेराव जाधव यांच्या छायाचित्रासह इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी एवढाच उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या गु्रपविषयी उलट-सुलट चर्चेलाही उधाण आले आहे. ग्रुपच्या अस्तित्वाबद्दल बोलले जात आहे.इस्लामपूर येथील गांधी चौकात लावलेल्या याच फलकावरून उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण