एन. डी. पाटील महाविद्यालयात के. आर. गावडे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:39+5:302021-06-04T04:20:39+5:30

०३ संतोष०४ सांगलीत एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयात प्रा. के. आर. गावडे यांचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. ...

N. D. K. Patil College. R. Gawde felicitated | एन. डी. पाटील महाविद्यालयात के. आर. गावडे यांचा सत्कार

एन. डी. पाटील महाविद्यालयात के. आर. गावडे यांचा सत्कार

०३ संतोष०४

सांगलीत एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयात प्रा. के. आर. गावडे यांचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. पाटील यांनी केला. यावेळी वैजयंता गावडे उपस्थित होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. के. आर. गावडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार झाला. प्रभारी प्राचार्य डाॅ. एस. डी. पाटील यांनी गावडे दाम्पत्याचा सत्कार केला. यावेळी डॉ. राजू सावंत, प्रा. पी. डी. पाटील, बी. ए. कोटलगी, एस. एस. सूर्यवंशी, सचिन पाटील, सुहास माने, पी. पी. होरे, आदी उपस्थित होते. गावडे यांच्यामुळे कुस्ती क्षेत्रात महाविद्यालयाचा लौकिक झाल्याच्या भावना प्राचार्य पाटील यांनी व्यक्त केल्या. ३३ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक खेळाडू घडविले. त्यांतील अनेकजण उच्च पदांवर काम करीत असल्याचे ते म्हणाले. सहकारी प्राध्यापकांनीही गावडे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.

गावडे यांनी सत्कारानंतर सांगितले की, संस्थेने पुरेपूर पाठिंबा दिल्यानेच मजल मारता आली. अनेक खेळाडू घडवता आले. प्रा. नागनाथ बनसोडे यांनी गावडे यांच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीचा आढावा घेतला.

Web Title: N. D. K. Patil College. R. Gawde felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.