शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विट्यातील देवस्थान जमिनीची परस्पर विक्री बेकायदेशीरच, खरेदीदार प्लॉटधारक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:11 IST

उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

विटा : येथील म्हसवडसिद्ध देवस्थानच्या सुमारे १४ एकर २८ आर. जमिनीची बेकायदेशीर परस्पर विक्री केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने देवस्थानच्या बाजूने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने अंतिम केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगत या निकालाविरुद्ध अपील केलेल्यांना फटकारले आहे.या निर्णयामुळे जमीन देवस्थानकडे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जमिनीत प्लॉट खरेदी करणारे चांगलेच अडचणीत आले आहेत. देवस्थानच्या मालकीची गट क्र. १०५२/२ मधील १४ एकर २८ आर. जमिनीची परस्पर बेकायदेशीर विक्री करण्यात आली होती. त्यामुळे सुवर्णा क्षीरसागर (रा. कोपरगाव, जि. अहिल्यानगर), प्रवीण शिवाजी जगताप (रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव), आदींनी २०१९ मध्ये महसूल विभागाच्या सचिवांसह ६९ जणांविरुद्ध ॲड. वैभवकुमार माने व ॲड. स्वप्नाली माने यांच्या मदतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावर निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, हिंदू कायद्यानुसार जमीन व मालमत्ता एखाद्या देवतेला समर्पित केली जाते, तेव्हा संपूर्ण मालकी थेट देवस्थानकडे जाते. खासगी मालमत्तेप्रमाणे त्यांची खरेदी-विक्री, भेटवस्तू, गहाणखत किंवा हस्तांतरण करता येत नाही. त्यामुळे विटा येथील देवस्थान जमिनीची मालकी देवस्थानकडेच राहील. हा निकाल एप्रिल २०२५ मध्ये झाला होता.त्याविरोधात येथील लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सुरेखा संजय निकम यांनी दि. २६ मे रोजी सर्वाेच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि अरविंदकुमार, सूर्यकांत आणि दीपंकर दत्ता यांच्यापुढे सुनावणी झाली. याचिकेत तथ्य असल्याचे अर्जदार न्यायालयाला पटवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यापूर्वीच फेटाळून लावली.

निकालाने राजकीय मंडळी, दलाल अडचणीतसर्वाेच्च न्यायालयाच्या या निकालाने देवस्थानची जमीन खरेदी करणाऱ्यांचे न्यायालयीन दरवाजे आता बंद झाले आहेत. प्लॉट खरेदीदारांसह विक्री केलेली काही राजकीय मंडळी व दलालही चांगलेच अडचणीत आले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालयTempleमंदिर