शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तारण जमिनीची परस्पर विक्री, महांकाली साखर कारखान्याला सांगली जिल्हा बँकेकडून फौजदारी नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 12:18 IST

याशिवाय संबंधित खरेदी व्यवहार रद्द करण्याबाबत बँकेने जिल्हाधिकारी तसेच मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला

सांगली : जिल्हा बँकेकडे तारण असलेली ८.५६ हेक्टर जमीन परस्पर विकल्याप्रकरणी कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना बँकेने फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. याशिवाय संबंधित खरेदी व्यवहार रद्द करण्याबाबत बँकेने जिल्हाधिकारी तसेच मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी याबाबतची माहिती दिली. ऋण वसुली अपीलीय प्राधिकरणाच्या आदेशानुसार थकीत कर्ज वसुलीसाठी महांकाली कारखान्याची ८० एकर जमीन विक्री करून कर्ज परतफेड करण्यास जिल्हा बँकेने सशर्त परवानगी दिली आहे. सप्टेंबरअखेर कारखान्याने सर्व थकीत कर्ज फेडावे, अशी अट घातली आहे. यासाठी कारखान्याला बँकेने हप्ते पाडून दिले आहे.

८० एकर जमीन सोडून महांकाली कारखान्याची दुसरी १३९ एकर जमीन जिल्हा बँकेकडे कर्जासाठी तारण आहे. ही जमीन २०१७ मध्ये कारखान्याने बँकेला तारण दिली आहे. मात्र, यातील एका गटावर जिल्हा बँकेचा बोजा अद्याप चढलेला नव्हता. याचा गैरफायदा घेत या गटातील ८.५६ हेक्टर जमीन कारखान्याने शिवदत्त लॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीला विकल्याची बाब उघडकीस आली आहे.पंधरा दिवसांपूर्वी हा बेकायदेशीर व्यवहार झाला आहे. याप्रकरणी बँकेने कारवाईचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना त्यांच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, याबाबतची नोटीस बजावली आहे. हा बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा बँकेने जिल्हाधिकारी, मुद्रांक अधिकारी व संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.

कडक कारवाई करा : फराटेमालमत्ता परस्पर विकल्याप्रकरणी कारखान्याच्या पदाधिकारी व संचालकांवर कडक कारवाईची मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे. जिल्हा बँक व कारखान्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणीही फराटे यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे.

शाखाधिकाऱ्यांवरही कारवाईजमीन विकत घेणाऱ्या कंपनीने बँकेशी संपर्क करून व्यवहार रद्द करणार असल्याचे सांगितले. २०१७ मध्ये ही जमीन बँकेला तारण दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत या जमीनवर बँकेचा बोजा का चढवला गेला नाही, याची विचारणा शाखाधिकाऱ्यास केली आहे. याचे उत्तर येताच संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहे. - शिवाजीराव वाघ, सीईओ, जिल्हा बँक

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेbankबँक