शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

रमजानच्या महिन्यात श्रीरामाची सेवा, सांगलीत रामनवमीच्या उत्सवानंतर स्वच्छतेसाठी मुस्लिम कार्यकर्ते सरसावले

By संतोष भिसे | Updated: March 31, 2023 14:42 IST

देशभरात कट्टरतावाद चिंताजनकरित्या फोफावत असल्याच्या काळात भाईचाऱ्याच्या धाग्याची वीण घट्ट

सांगली : सांगलीच्या राम मंदिर चौकात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रामनवमीचा जल्लोष रंगला. मध्यरात्रीस गर्दी संपली, आणि मागे रस्त्यावर उरला ढिगभर कचरा. तो पाहून रमजानच्या तराबीनंतर घरी परतणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे हात सफाईसाठी सरसावले. पहाटे दोनपर्यंत अवघा चौक टकाटक करुन सोडला.राम-रहिम आणि ईश्वर-नबी या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग म्हणजे मानवता आणि समाजसेवा असल्याचे मुस्लिम श्रद्धाळूंनी कृतीतून दाखवून दिले. देशभरात कट्टरतावाद चिंताजनकरित्या फोफावत असल्याच्या काळात भाईचाऱ्याच्या धाग्याची वीण घट्ट केली. धार्मिक सलोख्यासाठी सदैव अग्रेसर असलेल्या सांगलीकरांनी असा एकोपा वेळोवेळी कृतीतून दाखवून दिला आहे. त्याचा कधी गाजावाजाही केलेला नाही.

गुरुवारी दिवसभर साथीदार फाउंडेशन आणि राम मंदिर चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे भक्तीपूर्ण वातावरणात रामजन्मोत्सव साजरा झाला. हजारो भाविकांनी रांगा लावून श्रीरामाचे दर्शन घेतले. सायंकाळी मुख्य कार्यक्रम उशिरापर्यंत रंगला. मध्यरात्री संपला, तेव्हा चौकात सर्वत्र कचरा पसरला होता. भाविकांनी व कार्यकर्त्यांनी टाकलेल्या  प्लास्टिकच्या बाटल्या, कागदाचे रंगीबेरंगी कपटे, उधळलेली फुले अशा कचऱ्यामुळे रस्ता माखून गेला होता.दोन तासांत चौक चकाचकमहापालिकेचे सफाई पहाटे साफसफाई करणार होते, पण तत्पूर्वीच मुस्लिम कार्यकर्ते पोहोचले. तराबीनंतर घरी परतणाऱ्या मुस्तफा मुजावर यांनी स्वच्छता सुरु केली. सावली बेघर केंद्रातील रहिवासी आणि इन्साफ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेतले. मध्यरात्री बारापासून पहाटे र्सफाईनंतर चौकात कचऱ्याचा एकही कपटा उरला नाही. गोळा केलेला कचरा सकाळी महापालिकेच्या गाडीतून डेपोवर गेला. सकाळी सांगलीकर दिनक्रमासाठी बाहेर पडले, तेव्हा स्वच्छ चाैक पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले.

मी धार्मिक कट्टरतावाद कधीच जोपासला नाही. आजवरच्या वाटचालीत मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही धर्मांतील व्यक्तींनी वेळोवेळी पाठबळ दिले आहे. गुरुवारी सायंकाळी रामजन्मोत्सवाच्या आनंदात सहभागी झालो. रात्रीच्या नमाजनंतर घरी परतताना उत्सवाच्या मंडपासमोर सफाईदेखील केली. या कामात हिंदू-मुस्लिम मित्रांनी मदत केली. - मुस्तफा मुजावर, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :SangliसांगलीRam Navamiराम नवमीMuslimमुस्लीम