गायक महंमद रफी यांच्या जयंतीदिनी संगीत मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST2021-01-03T04:27:23+5:302021-01-03T04:27:23+5:30

फोटो ०२ सांगली १० सांगलीत गायक महंमद रफी यांच्या जयंती कार्यक्रमात समशेर इनामदार यांचा सत्कार शिरीष जोशी यांनी केला. ...

Music concert on the birthday of singer Mohammad Rafi | गायक महंमद रफी यांच्या जयंतीदिनी संगीत मैफल

गायक महंमद रफी यांच्या जयंतीदिनी संगीत मैफल

फोटो ०२ सांगली १०

सांगलीत गायक महंमद रफी यांच्या जयंती कार्यक्रमात समशेर इनामदार यांचा सत्कार शिरीष जोशी यांनी केला. यावेळी प्रिया कवठेकर उपस्थित होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दिवंगत गायक महंमद रफी यांची जयंती चाहत्यांनी साजरी केली. रफीरत्न पुरस्कार मिळालेले मिरजेतील समशेर इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित रसिकांनी रफी यांची विविध गाणी सादर करून आदरांजली वाहिली. भानुदास भोरे, शाम पोपटानी, मिलिंद देशपांडे, प्रिया कवठेकर, नितीन कारेकर, विजया सूर्यवंशी, सतीश करमुसे, कीर्ती जोशी, शिरीष जोशी, आनंद यादव, कुणाल शर्मा, रमाकांत घोडके, कविता तराळकर, जितेंद्र तराळकर, श्रीकांत पाटील, संजय अग्निहोत्री, दीनाबेन कुंडलिया, कीर्तिकुमार कुंडलिया, संतोषी झंवर, सुनील पाटील, हेमा फडतरे, ऋतुजा पवार, आदींनी रफींची विविध मूडमधील गाणी सादर करीत मैफलीची रंगत वाढविली. ‘रफी मुकेश किशोर फॅन क्लब’ स्थापन करण्याचा प्रस्तावही यावेळी मंजूर झाला. सुनीता पाटील, नंदकुमार शेटे यांनी सूत्रसंचालन केले.

....................................

Web Title: Music concert on the birthday of singer Mohammad Rafi