शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दुष्काळात होरपळताना सांगली जिल्हा बँकेच्या सभेत संगीत मैफल, संस्था प्रतिनिधींनी लावणीवर धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 17:01 IST

संस्था प्रतिनिधीसाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था

सांगली : पावसाळा संपत आला तरीही ५० टक्केही पाऊस झाला नसल्यामुळे जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. या शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक काही तरी निर्णय घेण्याऐवजी शुक्रवारी सांगली जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी संगीत मैफल रंगली होती. गायनाच्या कार्यक्रमावेळी संस्था प्रतिनिधींनी लावणीवर नृत्याचा ठेका धरला. संगीत मैफलीबरोबरच भोजनावळीचेही आयोजन केले होते.जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरू होण्यापूर्वी उपस्थित संस्था प्रतिनिधींच्या मनोरंजनासाठी गीतगायनाचा कार्यक्रम आणि सुग्रास भोजनव्यवस्था करण्यात आली होती. सभागृहात लावण्या सादर केल्या जात असताना काही जण प्रेक्षागारातून नृत्य करीत होते. तर पंगतीमध्ये फिरून काही संचालक उपस्थितांना जेवणासाठी आग्रह करीत होते. एकीकडे जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना मनोरंजनासाठी लावण्याचा कार्यक्रम आणि भोजनावळ आयोजित केल्याबद्दल काहींनी नाराजीही व्यक्त केली. सभेमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षीत होते; पण सभेपूर्वीच संगीत मैफल आणि संस्था प्रतिनिधीसाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था केली होती. 

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक