शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : खलाटीत तरुणाचा खून, दगडाने ठेचले : विसर्जन मिरवणुकीवेळी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:14 IST

खलाटी (ता. जत) येथील खंडू सिद्धू नाईक (वय २६) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खलाटीतील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या व्हरांड्यात शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देखलाटीत तरुणाचा खून, दगडाने ठेचले विसर्जन मिरवणुकीवेळी घटना

डफळापूर : खलाटी (ता. जत) येथील खंडू सिद्धू नाईक (वय २६) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खलाटीतील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या व्हरांड्यात शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली.खंडू नाईक हा खलाटील नाईक वस्तीवर राहत होता. या वस्तीवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे शुक्रवारी विसर्जन होते. यासाठी सायंकाळी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत खंडू सहभागी झाला होता. रात्री आठ वाजता ही मिरवणूक गावात जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आली. त्यावेळी खंडू मिरवणूकीतून बाजूला होऊन शाळेकडे गेला.

मिरवणूक तशीच पुढे गेली. रात्री दहा वाजता मिरवणूक झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते वस्तीकडे निघाले होते. खंडू व्हरांड्यात झोपला असल्याचे कार्यकर्त्यांना दिसले. त्याला उठवून घरी नेण्यासाठी ते त्याच्याजवळ गेले. पण खंडू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचे डोके दगडाने ठेचल्याचे पाहून कार्यकर्त्यांना धक्का बसला.

जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शाळेच्या परिसरात तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे चौकशी केली जात आहे. पण खंडूच्या खुनाचे अजून धागेदोरे लागले नाहीत. त्यामुळे खुनाचे गूढ वाढले आहेत.

टॅग्स :MurderखूनSangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी