सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:18+5:302021-09-02T04:58:18+5:30

सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने खुनी हल्ला करत त्यास जखमी करण्यात आले. याप्रकरणी शिवराज राजशेखर ...

Murderous attack on a youth in Sangli out of prejudice | सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने खुनी हल्ला करत त्यास जखमी करण्यात आले. याप्रकरणी शिवराज राजशेखर बन्ने (वय २०, रा. माहेश्वरी पार्क, माधवनगर) याने साद पखाली, आसिफ खान यांच्यासह पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी बन्ने सांगलीतील गणपतराव आरवाडे महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. महिन्याभरापूर्वी संशयित साद पखाली आणि आसिफ खान यांच्यासोबत बन्ने याचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग संशयिताच्या मनात धुमसत होता. बुधवारी सकाळी फिर्यादी शिवराज हा महाविद्यालयात प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठी आला होता. दुचाकी पार्किंग करत असताना, संशयित त्याठिकाणीच होते. संशयितांनी शिवराजला बघून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला व वादावादी वाढल्यानंतर संशयितांनी चाकूने शिवराजवर वार केले. वार झाल्यानंतर तो जखमी होऊन पडल्यानंतर संशयित तेथून पसार झाले. त्यानंतर तातडीने शिवराजला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्याने संशयितांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Murderous attack on a youth in Sangli out of prejudice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.