पाडळीत तरुणावर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST2020-12-26T04:22:38+5:302020-12-26T04:22:38+5:30

पाडळी (ता. कडेगाव) येथील विशाल अशोक प्रताप (वय २५) हा तरुण गुरुवारी रात्री कुटुंबियांसमवेत त्याच्या पाडळी - सोनकिरे ...

Murderous attack on a young man in Padli | पाडळीत तरुणावर खुनी हल्ला

पाडळीत तरुणावर खुनी हल्ला

पाडळी (ता. कडेगाव) येथील विशाल अशोक प्रताप (वय २५) हा तरुण गुरुवारी रात्री कुटुंबियांसमवेत

त्याच्या पाडळी - सोनकिरे रस्त्यावर असलेल्या घरी होता. दरम्यान रात्री ११:४५ वाजता अज्ञात

व्यक्ती त्याच्या घराकडे आली. ‘तुझ्याकडे काम आहे’, असे सांगून त्याने विशालला घराबाहेर बोलावून घेतले. घरापासून बाजुला नेऊन विशाल याच्या खांद्यावर धारदार शस्त्राने वार केला. गंभीर जखमी

झालेल्या विशालची किंकाळी ऐकून घरातील लोक बाहेर धावले. विशालवर हल्ला झाल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यांना पाहून हल्लेखोर जवळच उभ्या केलेल्या चारचाकी गाडीतून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत विशाल याला कुटुंबियांनी सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबतची फिर्याद सुवर्णा संग्राम प्रताप यांनी चिंचणी (वांगी) पोलिसात दिली असून, पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.

Web Title: Murderous attack on a young man in Padli