चपरासवाडी येथील तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:37+5:302021-07-27T04:28:37+5:30
जत : शेगाव (ता.जत) येथील चपरासवाडीत तुकाराम शिवाजी ताटे (वय ३५) या शिवसेना कार्यकर्त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून ...

चपरासवाडी येथील तरुणाचा खून
जत : शेगाव (ता.जत) येथील चपरासवाडीत तुकाराम शिवाजी ताटे (वय ३५) या शिवसेना कार्यकर्त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
तुकाराम ताटे यांचे मूळ गाव चपरासवाडी आहे. सध्या ते निगडीखुर्द (ता.जत) येथे शेतजमीन घेऊन राहात होते, तसेच त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय हाेता. त्यांना दोन मुलेही आहेत. साेमवारी सायंकाळी शेगाव-निगडीखुर्द रस्त्यावर निगडी हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आला. जत पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला असून, त्या दृष्टीने तपासाला गती दिली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम जत पाेलीस ठाण्यात सुरू होते. जमिनीच्या वादातून अथवा राजकीय वर्चस्वातून ही घटना घडली असावी, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला.