शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये तरुणाचा अनैतिक संबंधातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:01 IST

कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या शिवशक्तीनगर मधील सचिन अण्णासाहेब सुतार ( वय ३०) या तरुणाचा तीन संशयितांनी धारदार शस्त्राने पाटीत,पोटावर सपासप ५८ वार करून खून करून संशयितांनी मोटारसायकलीवरून धूम ठोकली. कुपवाड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून फरारीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

ठळक मुद्देकुपवाडमध्ये तरुणाचा अनैतिक संबंधातून खूनपाटीवर,पोटावर ५८ वार ; एकजण ताब्यात : दोघे फरार

कुपवाड : कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या शिवशक्तीनगर मधील सचिन अण्णासाहेब सुतार ( वय ३०) या तरुणाचा तीन संशयितांनी धारदार शस्त्राने पाटीत,पोटावर सपासप ५८ वार करून खून करून संशयितांनी मोटारसायकलीवरून धूम ठोकली. कुपवाड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून फरारीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास सचिन सुतार हा आपल्या मोटारसायकलीवरून (एम. एच.०९ ई.डी. ७४२४)मेव्हुणा व अन्य एक असे तिघेजण शिवशक्तीनगरमधून जात होता.

तो घरापासून काही अंतरावर गेल्यावर समोरून मोटारसायकली वरुन आलेल्या तीन संशयितांनी त्याच्या मोटारसायकलला धडक दिल्याने सुतार रस्त्यावर पडला. तीन संशयितापैकी एकाने मेव्हुण्याला धरले तर अन्य दोघांनी धारदार शस्त्राने सुतार वर हल्ला केला.सुतारच्या पाटीवर,पोटावर सपासप ५८ वार केले यावेळी मेव्हुण्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.या झटापटीत त्याच्या पायाला किरकोळ मार लागला.तर तिसरा साथीदार पळून गेला.सुतार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी हत्यारासह मोटारसायकलीवरून धूम ठोकली.

मेव्हुण्याने सदरची घटना नातेवाईकांना दिली.नातेवाईकांनी मयत अवस्थेत सुतार ला सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पोलिसांनी तातडीने एका संशयितास ताब्यात घेतले असून दोघांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :MurderखूनSangliसांगलीPoliceपोलिस