सिगारेटच्या जादा पैशावरून एकावर खुनीहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:49+5:302021-01-02T04:22:49+5:30
सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे हॉटेलमध्ये सिगारेटचे पैसे जादा घेतल्यावरून झालेल्या वादात एकावर चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी ...

सिगारेटच्या जादा पैशावरून एकावर खुनीहल्ला
सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे हॉटेलमध्ये सिगारेटचे पैसे जादा घेतल्यावरून झालेल्या वादात एकावर चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी वैभव रंगराव चौगुले (रा. दुधगाव) यांनी गणेश कुंभार (रा. कवठेपिरान, ता. मिरज) याच्याविरोधात ग्रामीण पाेलिसात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात विशाल नरके (रा. कोरोची, ता. हातकणंगले) हा जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुधगाव येथील दिनधन परमीट रूम बारमध्ये ३० डिसेंबर रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास संशयित आला होता. यावेळी एक ग्राहक सिगारेटच्या पैशावरून वाद घालत होता. यावेळी संशयिताने जखमी विशाल विठ्ठल नरके यास शिवीगाळ केली. यावेळी संशयित गणेशने विशालचा गळा पकडून ढकलून दिले व पोटात चाकूने भोसकले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी संशयिताविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.