शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:06 IST

मृत प्रभू याने सुनील यास ‘भाचीसोबत लग्न लावून न दिल्यास दोघेही आत्महत्या करू’ अशी धमकी दिली होती.

मिरज : गुंडेवाडी (ता. मिरज) येथे दोन दिवसांपूर्वी लाकडी दांडक्याने डोक्यात हल्ला केल्याने जखमी झालेल्या प्रभू पाेपट सूर्यवंशी (वय २२, रा. लंगरपेठ, ता. कवठेमहांकाळ) या तरुणाचा उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे (रा. लंगरपेठ) याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाचीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे मामा सुनील शिंदे याने प्रभू सूर्यवंशी याचा खून केल्याचे समाेर आले आहे.

मूळचा लंगरपेठ येथील सुनील शिंदे हा मिरजेत इंदिरानगर येथे बहिणीकडे राहत होता. मृत प्रभू हा सुनील याचा नातेवाइक आहे. सुनील याच्या मिरजेतील मेहुण्याच्या हाॅटेलात तो काम करीत होता. यादरम्यान त्याचे सुनील याच्या भाचीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. मृत प्रभू याने सुनील यास ‘भाचीसोबत लग्न लावून न दिल्यास दोघेही आत्महत्या करू’ अशी धमकी दिली होती. मात्र या लग्नास विरोध असल्याने सुनील याने प्रभू यास ‘तू गावी चल आणि तेथे गळफास लावून घे’ असे सांगितले.

यानंतर प्रभू व त्याचा नातेवाइक ज्ञानदेव अरविंद सूर्यवंशी व सुनील शिंदे हे तिघे शुक्रवारी दुपारी मिरजेतून लंगरपेठला दुचाकीवरून (एमएच १० ओएस १२३३) जात हाेते. तिघेजण गुंडेवाडीत पोहोचले असता तेथे सुनील यास भाचीने घरात गळफास लावून घेतल्याचा बहिणीचा फोन आला. यामुळे रागाच्या भरात सुनील याने ‘तुझ्यामुळे माझ्या भाचीने गळफास लावून घेतला. तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत रस्त्यावर पडलेल्या लाकडी दांडक्याने प्रभूच्या डोक्यात हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने प्रभूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याबाबत ज्ञानदेव सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीmiraj-acमिरज