शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ एजंटाचा खून, पत्नीवरही हल्ला करुन हल्लेखोर पसार; मिरजेतील हरीपूर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 11:15 IST

हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीजवळ हा प्रकार घडला. सांगली ग्रामीण पोलिसांत याची नोंद झाली आहे.

सांगली : हरीपूर (ता. मिरज) येथे आरटीओ एजंट म्हणून काम करणाऱ्या सुरेश नांद्रेकर (वय ४७) याचा तिघांनी खून केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. पतीस वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीवरही हल्लेखोरांनी हल्ला चढविला त्यामध्ये पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीजवळ हा प्रकार घडला. सांगली ग्रामीण पोलिसांत याची नोंद झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश नांद्रेकर आणि त्याच्या पत्नी संकष्टी सोडण्यापूर्वी बागेतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. दर्शन घेवून घरी परत येत असताना त्यांच्या घराजवळच तिघे हल्लेखोर दबा धरून बसले होते. या तिघा हल्लेखोरांनी दुचाकीच्या शॉकप्सरने सुरेश यांच्या डोक्यावर वार केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीवरही हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर हे तिघे हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी दाम्पत्याला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी पहाटे सुरेश नांद्रेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नीवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीmiraj-acमिरज