शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कुख्यात गुंड सच्या टारझनचा खून, संशयितास अटक; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

By शीतल पाटील | Updated: July 24, 2023 14:39 IST

नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधाचा राग, सच्या टारझन झोपेत असतानाच केले कोयत्याने सपासप वार

कुपवाड : मोकातील आरोपी कुख्यात गुंड सचिन ऊर्फ कमलाकर पांडुरंग जाधव ऊर्फ सच्या टारझन (वय ४५, मूळ नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा, सध्या रा. अहिल्यानगर, कुपवाड) याचा सोमवारी पहाटे अहिल्यानगर येथे कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. नात्यातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून गणेश विनोद मोरे (वय १९) याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. खुनानंतर संशयित स्वत: कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात हजर झाला.सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सध्या जामिनावर होता. गेल्या काही दिवसांपासून तो कुपवाड-माधवनगर मार्गावरील अहिल्यानगर परिसरात वास्तव्यास होता. संशयिताच्या नात्यातील महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. तिच्याच घरात पहाटे पाचच्या सुमारास सच्या टारझन झोपेत असताना संशयिताने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. सच्याच्या डोक्यात, मानेला, तोंडाला वर्मी वार झाले. त्याने हाताने वार अडविण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या हाताची बोटेही तुटली. घरात रक्ताचा सडा पडला होता.गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.हल्ल्यानंतर संशयित गणेश मोरे कोयत्यासह कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खुनाची कबुली दिली. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रमंडळींची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांचे पथक दाखल झाले होते.

टारझनविरुद्ध नऊ गुन्हेसच्या टारझनवर सांगली शहर, विश्रामबाग आणि कऱ्हाड पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. नगरसेवक दाद्या सावंतचा खून, अवैध शस्त्रसाठा, आत्महत्येस प्रवृत्त करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, मारामारी, खंडणी असे सात गुन्हे सांगली शहर पोलिसांत दाखल आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात खंडणी आणि अवैध शस्त्राचा गुन्हा दाखल आहे. काही वर्षांपूर्वी सच्याकडून कऱ्हाड पोलिसांनी पाच पिस्तुले जप्त केली. सांगलीत त्याच्या दोन साथीदारांकडून तीन पिस्तुले, दोन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस