शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मुकादमाचा खून, तिघा संशयितांना अटक; जत तालुक्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:40 IST

याबाबत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र पैशाच्या देवाण घेवाणीवरूनच हा खून झाल्याचे समोर आले आहे.

संख : जत तालुक्यातील करेवाडी तिकोंडी तेथील ऊसतोडणी मुकादम नामदेव लक्ष्मण तांबे (वय ४५ रा. तांबेवस्ती करेवाडी) यांच्या खून प्रकरणी तिघां संशयिताना उमदी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.२०) रात्री घडली होती. याबाबत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र पैशाच्या देवाण घेवाणीवरूनच हा खून झाल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी मुकादम बबन हणमंत कोळेकर (वय ३६, रा.करेवाडी कोंतवबोबलाद), बाबू शंकर शेंडगे (३५, रा.तिकोंडी), ट्रक्टर चालक रामा आप्पाराया बिळूर (२७, रा तिकोंडी) या तिघांना अटक करून या गुन्ह्यात वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.याबाबत माहिती अशी की, मुकादम नामदेव तांबे हे साखर कारखान्यास ऊसतोडणी मजूर पुरविण्याचे काम करतात. त्यांच्या सोनहिरा साखर कारखान्यास तीन टोळ्या आहेत. रविवारी (दि.२०) रात्री करेवाडी कोंतवबोबलाद येथील ओळखीच्या लोकासमवेत पार्टीसाठी जातो म्हणून ते दुचाकी घेऊन गेले. मात्र ते घरी आलेच नाहीत.अखेर त्याचा मृतदेह तांबेवाडी तिकोंडी रस्त्यावर घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्याकडेला आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. याबाबत अपघाती मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले. मात्र, मृत्यूबाबत कुटुंबाकडून संशय व्यक्त करण्यात आला होता.   मयत नामदेव तांबे व अरोपी बबन कोळेकर व इतर दोघे हे ऊसतोडणी कामगार पुरवण्याचे काम करीत होते. त्यांच्यातील पैशाचे व्यवहार परस्पर मिटवले म्हणून व पैशाच्या देवाण घेवाणीवरून व उसतोडणी टोळीतील कामगार परस्पर पळवतो म्हणून वाद झाला होता. यातून जबर मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार हे करीत आहेत.सहा दिवसाची पोलीस कोठडीसंशयित तीन आरोपींना जत येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी