द्राक्षबागेत मजुरांना शिवीगाळ केल्याने सख्ख्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST2021-03-18T04:25:36+5:302021-03-18T04:25:36+5:30

फाेटाे : १७०३२०२१ मनोज इंगवले-देशमुख : मृत मनोज इंगवले-देशमुख लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : करोली (एम., ता. मिरज) येथे ...

Murder of a number of brothers for abusing workers in a vineyard | द्राक्षबागेत मजुरांना शिवीगाळ केल्याने सख्ख्या भावाचा खून

द्राक्षबागेत मजुरांना शिवीगाळ केल्याने सख्ख्या भावाचा खून

फाेटाे : १७०३२०२१ मनोज इंगवले-देशमुख : मृत मनोज इंगवले-देशमुख

लाेकमत न्यूज नेटवर्क

मिरज : करोली (एम., ता. मिरज) येथे द्राक्षबागेत कामाला येणाऱ्या मजुरांना शिवीगाळ करीत असल्याने धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी गज घालून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. १६) रात्री घडली. मनोज वसंत इंगवले-देशमुख (वय ४२, रा. करोली एम.) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी नितीन वसंत इंगवले-देशमुख (४०) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मृत मनोज इंगवले-देशमुख व संशयित नितीन इंगवले-देशमुख सख्खे भाऊ असून, दोघांनाही मद्याचे व्यसन होते. दोघांची करोली येथे तीन एकर शेती आहे. वडिलांनी दोघांना शेतजमीन वाटून दिल्यानंतर नितीनने दीड एकरात द्राक्षबाग लावली आहे. मृत मनोज मद्याच्या नशेत वारंवार नितीनच्या द्राक्षबागेत कामाला येणाऱ्या मजुरांना शिवीगाळ करीत हाेता. घरातही भावासोबत भांडण करीत होता.

मंगळवारी सकाळी मनोजने नितीनच्या द्राक्षबागेत काम करणाऱ्या मजुरांना शिवीगाळ केली. ‘येथे यायचे नाही’, असे म्हणत त्यांना बागेतून हाकलून दिले. याबाबत नितीनने मनोजला जाब विचारल्याने दोघा भावांत भांडण झाले. रात्री साडेदहा वाजता दोघांनीही मद्यपान केल्यानंतर सकाळच्या वादावरून त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. यावेळी रागाच्या भरात नितीनने तेथे पडलेला लोखंडी गज मनोजच्या डोक्यात घातला. डोक्यात मोठी दुखापत होऊन गंभीर जखमी झाल्याने मनोजचा जागीच मृत्यू झाला.

पोलीसपाटील मनीषा पाटील यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून फरार झालेल्या नितीनला मणेराजुरी (ता. तासगाव) येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. मनोज याच्या खुनासाठी वापरलेला लोखंडी गज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मृत मनोज यांचा चुलत भाऊ विश्वजित इंगवले-देशमुख याने फिर्याद दिली आहे.

Web Title: Murder of a number of brothers for abusing workers in a vineyard