शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

सांगलीत विवाहित विद्यार्थिनीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:55 PM

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील वैशाली रामदास मुळीक (वय २१) या विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात ...

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील वैशाली रामदास मुळीक (वय २१) या विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन शाळेतील वर्गात रविवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या एका प्राध्यापकावर संशय आहे. हा खून ‘नाजूक’ संबंधातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.मिरज तालुक्यातील मल्लेवाडी माहेर असलेल्या वैशालीचा तीन वर्षांपूर्वी रामदास मुळीक यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षाचा मुलगा आहे. वैशालीने दोन वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पदवी (बी.ए.) अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. ती सध्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. या विद्यापीठाचे कार्यालय शांतिनिकेतनमध्ये आहे. येथे अभ्यास केंद्राचे प्रत्येक रविवारी वर्ग भरतात. या रविवारीही सकाळी दहा वाजता वैशालीस तिच्यापतीने शांतिनिकेतनमध्ये सोडले.त्यानंतर पती चिंचणीला देवदर्शनासाठी निघून गेला. दरम्यान, शांतिनिकेतनमधील तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत वैशालीचा वर्ग भरणार होता. सकाळी अकरा वाजता एक विद्यार्थिनी या वर्गाकडे गेली. त्यावेळी वर्गाचा दरवाजा आतून बंद असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने, आत कोण आहे का? अशी हाक मारली. त्यावेळी आतून ‘जरा थांबा, आमचे काम सुरु आहे’, असा आवाज आला. त्यामुळे ही विद्यार्थिनी दुसºया वर्गात जाऊन बसली. साडेअकरा वाजता अन्य विद्यार्थीही याच वर्गात आले. त्यावेळी वर्गाचा दरवाजा उघडा होता. विद्यार्थी आत गेले असता, वैशाली मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्र प्रशासनाशी संपर्क साधला. संजयनगर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.वैशालीचा मृतदेह बेंचजवळ पडला होता. पायात सॅन्डल तशीच होती. पर्सही पडलेली होती. पर्समध्ये तिचे ओळखपत्र व छायाचित्र सापडले. यावरुन तिची ओळख पटली. केसातील क्लिप तुटून पडलेली होती. पंचनामा करुन मृतदेह विच्छेदन तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविला. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोक वीरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी सात वाजता विच्छेदन तपासणी पूर्ण झाली. यामध्ये वैशालीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गळा आवळण्यापूर्वी भिंतीवर तिचे डोके व चेहरा आपटल्याचे दिसून आले आहे. तिच्या चेहºयावर जखमा आढळून आल्या आहेत.पोलीस मागावरवैशाली मुळीक हिचा खून ‘नाजूक’ संबंधातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. संजयनगर व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची स्वतंत्र पथके संशयित प्राध्यापकाच्या मागावर आहेत. कसबे डिग्रज येथील त्याच्या घरावरही छापा टाकण्यात आला. पण तो घरीही गेला नसल्याची माहिती मिळाली. त्याचा मोबाईलही बंद आहे. तो सापडल्यानंतर या खुनाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.‘सीसीटीव्ही’त कैदशांतिनिकेतनमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांची खुनाच्या तपासात पोलिसांना मोठी मदत मिळाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी पटकन सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजची तपासणी केली. वैशाली वर्गाकडे जात असताना या कॅमेºयात कैद झाली आहे. तिच्यासोबत अभ्यास केंद्रातील संशयित प्राध्यापकही दिसत आहे. काही वेळानंतर हा प्राध्यापक घाईगडबडीत एकटाच तेथून बाहेर पडल्याचेही कैद झाले आहे. तसेच तो मोबाईल बंद करून पसारही झाल्याने त्याच्यावरच संशय बळावला आहे. तोही कसबे डिग्रजचाच असल्याचे पोलिसांनी सांगितले.