चिंतामणीनगरमध्ये पत्नीवर खुनीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:28+5:302021-01-08T05:29:28+5:30

सांगली : शहरातील चिंतामणीनगर येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्‍यात लोखंडी गजाने हल्ला करून जखमी केले. ही घटना सोमवारी ...

Murder attack on wife in Chintamani Nagar | चिंतामणीनगरमध्ये पत्नीवर खुनीहल्ला

चिंतामणीनगरमध्ये पत्नीवर खुनीहल्ला

सांगली : शहरातील चिंतामणीनगर येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्‍यात लोखंडी गजाने हल्ला करून जखमी केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. पूजा अमर देसाई (वय २१) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी पती अमर रवींद्र देसाई (३०) याला अटक केली आहे.

अमर देसाई हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. चिंतामणीनगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे, तेथे देसाई कुटुंब वॉचमन म्हणून काम करते. त्या इमारतीजवळच एका पत्र्याच्या खोलीत देसाई दाम्पत्य मुलांसमवेत राहते. सोमवारी मध्यरात्री अमर आणि पूजा यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर चिडलेल्या अमरने लोखंडी गजाने पूजावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर अमर स्वतः संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपण पत्नीला मारल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पूजाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार अमर देसाई याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Murder attack on wife in Chintamani Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.