सांगलीत तरुणावर खुनीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:23 IST2021-01-17T04:23:55+5:302021-01-17T04:23:55+5:30

सांगली : किरकोळ कारणातून शहरातील गणेशनगर येथील तरुणावर धारदार हत्याराने खुनी हल्ला करण्यात आला. निहाल समीर सय्यद (वय ...

Murder attack on Sangli youth | सांगलीत तरुणावर खुनीहल्ला

सांगलीत तरुणावर खुनीहल्ला

सांगली : किरकोळ कारणातून शहरातील गणेशनगर येथील तरुणावर धारदार हत्याराने खुनी हल्ला करण्यात आला. निहाल समीर सय्यद (वय २३, रा. गणेशनगर) असे जखमी तरुणाचे नाव असून, शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी स्वप्निल अनिल भोरे (वय २०) व शुभम शाम जिरंगे (२३, दोघेही रा. गणेशनगर) या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयितांसह जखमी हे एकमेकांचे मित्र आहेत. रात्री पावणेअकराच्या सुमारास गणेशनगर जलतरण केंद्राजवळ त्यांच्यात वाद झाला. यातून संशयितांनी धारदार हत्याराने निहालवर हल्ला केला. त्यात निहालवर तीन वार करण्यात आले आहेत. जखमी अवस्थेत त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी निहाल याच्या मित्राने दिलेल्या फिर्यादीनुसार, भोरे आणि जिरंगे या दोघांना अटक करण्यात आली. १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Murder attack on Sangli youth