पालिकेत चिखल फेको आंदोलनाचा इशारा

By Admin | Updated: August 31, 2014 23:53 IST2014-08-31T22:38:56+5:302014-08-31T23:53:09+5:30

क्रांतिसिंह नाना पाटील विचार मंचने दिला इशारा

In the municipality, the warning about the mud-Feko movement | पालिकेत चिखल फेको आंदोलनाचा इशारा

पालिकेत चिखल फेको आंदोलनाचा इशारा

सांगली : शहरातील शंभरफुटी रस्ता परिसरातील उपनगरांत ड्रेनेज, केबल व पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात चरखुदाई झाली आहे. या परिसरातील रस्ते पूर्ववत न केल्यास महापालिकेत चिखल फेको आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिसिंह नाना पाटील विचार मंचने दिला आहे.
हनुमाननगर, विठ्ठलनगर, त्रिमूर्ती कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, विनायकनगर, शामरावनगर, आप्पासाहेब पाटीलनगर या भागात रस्त्यांची खुदाई झाली आहे. पावसामुळे रस्त्यांची भयानक स्थिती आहे. विचार मंचच्यावतीने आयुक्त अजिज कारचे यांना निवेदनही देण्यात आले होते. त्यांनी पन्नासफुटी रस्त्यावर मुरूम टाकण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात चार ते पाच डंपर मुरूम टाकून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पालिकेने रस्ते पूर्ववत केले नाहीत, तर रस्त्यावरील चिखल पालिकेत टाकावा लागेल, असा इशारा दिला आहे.
प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. शहरातील एका मॅटर्निटी होममध्ये शेकडो गर्भपात होतात, याचा पालिकेच्या आरोग्य विभागाला पत्ताही लागत नाही. प्रत्येक बाबीत राज्य व केंद्र शासनाच्या निधीवर अवलंबून रहावे लागत आहे, असे म्हटले आहे.
या पत्रकावर अध्यक्ष उमेश देशमुख, कार्याध्यक्ष रत्नाकर नांगरे, सचिव रियाज जमादार यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: In the municipality, the warning about the mud-Feko movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.