महापालिकेच्या सेवा आता एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:51+5:302021-09-06T04:29:51+5:30
ओळी :- महापालिकेकडून विविध ऑनलाईन सेवांचे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, उत्तम साखळकर, ...

महापालिकेच्या सेवा आता एका क्लिकवर
ओळी :- महापालिकेकडून विविध ऑनलाईन सेवांचे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, उत्तम साखळकर, नकुल जकाते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेकडून विविध ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता जन्म-मृत्यू दाखले, नाट्यगृह बुकिंग, होर्डिंग्ज परवानगी, घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी, घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता बिल भरणा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
या ऑनलाईन सेवेचे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, गटनेते विनायक सिंहासने, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे, माजी उपमहापौर विजय घाडगे, उपायुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार, पाणी पुरवठा अधीक्षक काका हलवाई आदी उपस्थित होते. महापालिकेचे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, अतुल बसर्गी, प्रदूमन जोशी यांनी या ऑनलाईन सेवा तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
महापालिकेच्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून आता जन्म-मृत्यू दाखले, नाट्यगृह बुकिंग, होर्डिंग्ज परवानगी, घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी अर्ज, घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता बिल भरणा आता एका क्लिकवर करता येणार आहे. यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावरून हे दाखले उपलब्ध होणार आहेत. या सेवेमुळे नागरिकांच्या वेळेची बचत झाली असून, गैरसोयही टळली आहे. या ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर सूर्यवंशी यांनी केले आहे.