महापालिकेच्या प्रसूतिगृहाला मिळाले अत्याधुनिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:38+5:302021-09-15T04:31:38+5:30

ओळी :- महापालिकेच्या प्रसूतिगृहाला अत्याधुनिक साहित्य महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. लोकमत ...

Municipal maternity hospital received state-of-the-art equipment | महापालिकेच्या प्रसूतिगृहाला मिळाले अत्याधुनिक साहित्य

महापालिकेच्या प्रसूतिगृहाला मिळाले अत्याधुनिक साहित्य

ओळी :- महापालिकेच्या प्रसूतिगृहाला अत्याधुनिक साहित्य महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या सांगली आणि मिरजेतील प्रसूतिगृहाला मंगळवारी अत्याधुनिक साहित्य देण्यात आले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते. महिला बालकल्याण समितीच्या पाठपुराव्यामुळे प्रसूतिगृहांना हे आधुनिक साहित्य मिळाले आहे.

महापालिकेच्या प्रसूतिगृहांना अत्याधुनिक यंत्रणा आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ. गीतांजली ढोपे पाटील व सदस्यांनी महापौर, आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. लहान बाळाचे वजन काटा, चिटल फॉरसेप, गॅसची शेगडी लेबर टेबल, डॉक्टरांसाठी टेबल खुर्ची, फिटल मॉनिटर, कपाट, छोटे इनव्हर्टर, नेब्युलायझर मशिन, सक्शन मशीन, वॉटर प्युरीफायर, शाडोलेस लॅम्प, एअरपोर्च बेंचेस आणि मोठ्यांचा वजनकाटा आदी साहित्य मंगळवारी देण्यात आले.

या वेळी स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, उपायुक्त चंद्रकांत आडके, माजी सभापती नसीमा नाईक, अनारकली कुरणे, रोहिणी पाटील, सुनंदा राऊत, शुभांगी साळुंखे, मदिना बारुदवाले, युवराज बावडेकर, संजय यमगर, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, प्रसूतिगृहाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता पवार, स्मिता वाघमोडे उपस्थित होते.

Web Title: Municipal maternity hospital received state-of-the-art equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.