इस्लामपुरात दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदेचे अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:47 IST2021-02-18T04:47:47+5:302021-02-18T04:47:47+5:30

इस्लामपूर : नगरपरिषद कार्यक्षेत्रातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या हस्ते अर्थसाहाय्याच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...

Municipal Council financial assistance to persons with disabilities in Islampur | इस्लामपुरात दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदेचे अर्थसाहाय्य

इस्लामपुरात दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदेचे अर्थसाहाय्य

इस्लामपूर : नगरपरिषद कार्यक्षेत्रातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या हस्ते अर्थसाहाय्याच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. ते म्हणाले, शहरामध्ये ५१२ दिव्यांग नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांतील २४० नागरिकांनी नगर परिषदेकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यांपैकी २० पात्र दिव्यांगांना धनादेशाचे वितरण करीत आहोत. उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यामध्ये अर्थसाहाय्याची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक वैभव पवार, माजी नगरसेवक भास्कर कदम, रियाज पटेल, दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष संतोष थोरात, शिवाजी लाखे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होेते.

फोटो : १७०२२०२१-आयएसएलएम- दिव्यांग न्यूज

इस्लामपूर येथे नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना अर्थसाहाय्याचे धनादेश देण्यात आले. यावेळी भास्कर कदम, रियाज पटेल उपस्थित होते.

Web Title: Municipal Council financial assistance to persons with disabilities in Islampur