महापालिका २० व्हेंटिलेटर्स खरेदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:11+5:302021-04-27T04:28:11+5:30

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून २० व्हेंटिलेटर्स ...

Municipal Corporation will purchase 20 ventilators | महापालिका २० व्हेंटिलेटर्स खरेदी करणार

महापालिका २० व्हेंटिलेटर्स खरेदी करणार

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून २० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी बुधवारी स्थायी समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत व्हेंटिलेटर्स खरेदीसह ऑक्सिजन प्लांट उभारणीवरही शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

महापालिकेच्या गत स्थायी समिती सभेत ऑक्सिजन प्लांट व व्हेंटिलेटर्स खरेदीला ऐनवेळच्या विषयात मंजुरी दिली होती. पण पुन्हा वादाचा विषय नको, यासाठी आता विषयपत्रिकेवर विषय घेऊन तातडीची सभा बुधवारी ऑनलाईन घेतली जाणार आहे. या सभेत ऑक्सिजन प्लांट व २० व्हेंटिलेटर्स खरेदीस मान्यता दिली जाणार आहे. २० व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी सुमारे ७८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता भासत असताना महापालिकेकडून रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेने मिरज शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोरोना सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. हा ऑक्सिजन निर्मिती प्लांट आहे. ‘कोरोना’नंतर या ऑक्सिजन प्लांटचा वापर महापालिकेच्या दवाखान्यांसाठी होईल. त्यातून शिल्लक राहणारा ऑक्सिजन अन्य दवाखान्यांना पुरवठा केला जाईल. त्यातून महापालिकेचे उत्पन्न सुरू होणार आहे. ऑक्सिजन प्लांट व व्हेंटिलेटर्स खरेदी असा सुमारे २ कोटी रुपयांच्या खर्चाला ‘स्थायी’त मान्यता दिली जाणार आहे.

Web Title: Municipal Corporation will purchase 20 ventilators