जतचे नगरसेवक कदम गटाकडे
By Admin | Updated: November 9, 2016 00:59 IST2016-11-09T00:59:19+5:302016-11-09T00:59:19+5:30
विधानपरिषद : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षासह १४ जणांचा पाठिंबा

जतचे नगरसेवक कदम गटाकडे
पत्रपरिषदेत दिली माहिती : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीला पाकिस्तानात समारोप
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीला २ आॅक्टोबर २०१८ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहे. या १५० व्या जयंतीनिमित्त गांधी विचारांचा प्रचार व्हावा, यासाठी वर्धेतील ज्ञानेश्वर येवतकर व पुणे येथील नितीन सोनवणे हे दोघे ‘विश्व मैत्री सायकल यात्रा’ करणार आहेत. १०९५ दिवसांची ही यात्रा १८ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता सेवाग्राम आश्रम येथून निघून पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरात तिचा समारोप होणार असल्याची माहिती येवतकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
महात्मा गांधी यांची १५० वी जयंती संपूर्ण जगात ‘विश्व महोत्सव’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यामुळे त्यांचा अहिंसा, शांती, मैत्री आणि प्रेम हा संदेश जगभर साजरा करण्यात यावा याकरिता ही सायकल यात्रा असल्याचेही ते येवतकर म्हणाले. यात्रेकरिता लागणारी रक्कम लोकसहभागातून उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याकरिता वर्धेच्या जनजागृती मंचाच्यावतीने काही मदत करण्यात आल्याचे यावेळी येवतकर म्हणाले. या प्रयोतून विश्व शांतीसाठी बलिदान देणाऱ्या सर्वच हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रा. अमोल गाढवकर यांची उपस्थिती होती. त्यांनीही आयोजनासंदर्भात माहिती दिली.(प्रतिनिधी)
७५ हजार किलोमीटरचा प्रवास
हा सायकल प्रवास ७५ हजार किलोमिटर असून ‘१०९५’ दिवसांचा आहे. हे दोन्ही सायकल यात्री जगभरात २६६ ठिकाणी मुक्काम करणार आहेत. प्रवासादरम्यान शांती, अहिंसेच्या मार्गाने काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गाव, शहर, संघटना तसेच शाळा, विद्यापीठांना भेटी देणार आहेत.
विश्व मैत्री यात्रेचा मार्ग
ही विश्व मैत्री यात्रा सेवाग्राम आश्रमातून सुरू होऊन मुंबईला जाईल. येथून विमानमार्गाने मणिपूरच्या इम्फालमध्ये दाखल होईल. येथून इम्फाल ते बर्मा लाओस मार्गे व्हियतनाम दाखल. पूढे कंबोडिया, थाइलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बाली, फिलीपेंस, तैवान, चीन, दक्षिण व उत्तर कोरिया मार्गे जपानमध्ये पोहोचणार आहे. जपानहून हवाई मार्गाने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को या शहरात पोहोचणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा तेथून प्रारंभ होईल. त्यामध्ये मेक्सिको, दक्षिण अमेरिका, वाशिंग्टन, न्यूयॉर्क, कॅनडा, लंडन, आयर्लंड, इंग्लंड, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, रशिया मार्गे युरोपीयन देशात पोहोचणार आहे. पुढच्या प्रवासात संपूर्ण युरोपीयन देश भ्रमण करून आफ्रिकन देशात प्रवेश करणार आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा टप्पा इजिप्त मार्गाने मध्य आशियाच्या जॉर्डन, इडोल, कुवेत, इराण, इराक, अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तान मधील इस्लामाबाद शहरात ‘२ आॅक्टोबर २०१९’ रोजी विश्व मैत्री यात्रा समाप्त करण्यात येईल.
विविध सामाजिक संघटनांकडे सहकार्य
या सायकल यात्रेसाठी एकूण ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी लोकसहभागातून उभा करण्यात येणार आहे. याकरिता अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये गांधी सर्व्हे सुलभ, गांधी स्मारक निधी पुणे, अखिल भारतीय सर्वोदय समाज, भूदान मंडळ, वैद्यकीय जनजागृती मंच या संघटनांचा समावेश आहे. काही विदेशी संस्थांनी त्यांच्या शहरातील यात्रेला येणारा खर्च उचलला आहे.