कुपवाडमध्ये महापालिकेने अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:55+5:302021-01-20T04:27:55+5:30

कुपवाड : शहरातील कुपवाड ते मिरज रस्त्यालगत असलेल्या संत रोहिदास व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक परिसरात सहा ...

Municipal Corporation removed encroachment in Kupwad | कुपवाडमध्ये महापालिकेने अतिक्रमण हटविले

कुपवाडमध्ये महापालिकेने अतिक्रमण हटविले

कुपवाड : शहरातील कुपवाड ते मिरज रस्त्यालगत असलेल्या संत रोहिदास व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक परिसरात सहा खोकी व सहा हातगाडी अशा बारा व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे मंगळवारी सायंकाळी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढून ती जप्त केली. यावेळी महापालिका अधिकारी व खोकीधारकांत जोरदार वादावादी झाल्याने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली.

कुपवाड-मिरज रस्त्यालगत काही खोकी व हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी यापूर्वी काही नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. मंगळवारी आठवडा बाजार असल्याने गर्दी झाली होती. कुपवाड शहर प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, विकास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमणे हटविताना काही खोकीधारक, हातगाडीचालक व महापालिका अधिकारी यांच्यात वादावादी झाली. अखेर महापालिका प्रशासनाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने शहरातील अतिक्रमणे काढून ती जप्त केली. अतिक्रमण निर्मूलन पथकात १५ ते २० कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.

फोटो-१९कुपवाड१

फोटो ओळ - कुपवाड : शहरात अतिक्रमण केलेली खोकी हटविताना महापालिका कर्मचारी.

Web Title: Municipal Corporation removed encroachment in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.