संभाव्य आपत्तीसाठी महापालिका सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:50+5:302021-06-10T04:18:50+5:30
ओळी : संभाव्य आपत्तीसाठी महापालिकेची अग्निशामन यंत्रणा सज्ज झाली असून, पुराचा मुकाबला करण्यासाठी साधनसामग्रीची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती ...

संभाव्य आपत्तीसाठी महापालिका सज्ज
ओळी : संभाव्य आपत्तीसाठी महापालिकेची अग्निशामन यंत्रणा सज्ज झाली असून, पुराचा मुकाबला करण्यासाठी साधनसामग्रीची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. (छाया : सुरेंद्र दुपटे)
संजयनगर : संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आतापासून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. अग्निशमन विभागाने गुरुवारी सर्वच यंत्रसामग्रीची तांत्रिक तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये सांगली शहराला महापुराचा फटका बसला होता. निम्म्याहून अधिक शहर पाण्याखाली होते. सव्वा लाख नागरिकांना स्थलांतर करावे लागले होते. या काळात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थानातील त्रुटीही समोर आल्या होत्या. आयुक्त नितीन कापडणीस यांनी गेल्या दीड वर्षात आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्यावर भर दिला. पूरपट्ट्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले. नागरिकांना स्थलांतरणाच्या नोटिसा देण्यात आल्या.
आता अग्निशमन विभागाने आपत्ती काळात वापरण्यात येणाऱ्या सर्वच साहित्याची तांत्रिक तपासणी करून दुरुस्ती हाती घेतली. अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्यासह कर्मचाऱी आपत्ती निवारणासाठी सज्ज झाले आहेत. यांत्रिक बोटीबरोबर यंत्रांचीही तपासणी करण्यात आली.
चौकट
उपलब्ध साधनसामग्री
अग्निशामन विभागाकडे फायर टेंडर ६, रेस्क्यू व्हॅन १, लाईफ जॅकेट १ हजार, यांत्रिक बोटी ११, रबर बोटी 3, मनुष्य बळ ६० जवान, लाईफ रिंग १७, अग्निशामन उपकरणे २४ अशी साधनसामग्री उपलब्ध आहे.