महापालिकेकडून जन्म-मृत्यूच्या ऑनलाईन नोंदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:48+5:302020-12-05T05:07:48+5:30
सांगली : महापालिकेच्या २०१३ ते २०१९ या सहा वर्षातील जन्म-मृत्यूच्या नोंदी ऑनलाईन होणार आहे. यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या ...

महापालिकेकडून जन्म-मृत्यूच्या ऑनलाईन नोंदी सुरू
सांगली : महापालिकेच्या २०१३ ते २०१९ या सहा वर्षातील जन्म-मृत्यूच्या नोंदी ऑनलाईन होणार आहे. यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार प्रशासनाकडून गतीने काम सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेच्या २०१३ ते २०१९ या कालावधितील जन्म-मृत्यू नोंदी ऑनलाईन करण्याचे काम प्रलंबित होते. ई-गव्हर्नसचा ठेका खासगी कंपनीकडे असताना जुन्या रेकाॅर्डची संगणकावर नोंदणी करण्यात आली होती. हा ठेका २०१३ मध्ये रद्द करण्यात आला. तेव्हापासून संगणकावरील नोंदी झालेल्या नव्हत्या. आयुक्त कापडणीस यांनी पुढाकार घेत संगणक नोंदीची प्रक्रिया सुरू केली. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी विलंब लागणार नाही.