महापालिकेने तक्षिला शाळेची कुंपण भिंत पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:24+5:302021-09-11T04:27:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी शहरातील तक्षिला शाळेची कुंपण भिंत पाडली. याबाबत न्यायालयात दावा दाखल ...

Municipal Corporation demolished the fence wall of Takshila school | महापालिकेने तक्षिला शाळेची कुंपण भिंत पाडली

महापालिकेने तक्षिला शाळेची कुंपण भिंत पाडली

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी शहरातील तक्षिला शाळेची कुंपण भिंत पाडली. याबाबत न्यायालयात दावा दाखल असताना प्रशासनाच्या कारवाईबाबत संताप व्यक्त होत आहे.

शहरातील शामरावनगर परिसरात तक्षिला शाळा आहे. या शाळेची दक्षिण बाजूची भिंत डीपी रस्त्यावर विनापरवाना बांधली होती. याबाबत मार्च महिन्यात महापालिकेने ही भिंत काढून घेण्याची नोटीस शाळेला बजाविली होती. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला. महापालिकेने निकालापर्यंत भिंतीचे बांधकाम पाडणार नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले होते, असा दावा शाळेकडून करण्यात आला.

दरम्यान, शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने जेसीबीच्या साहाय्याने शाळेची भिंत पाडली. याबाबत पालक व शाळा व्यवस्थापनाकडून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने शाळेल्या दिलेल्या नोटीसवर तारीखही नाही. त्यामुळे साराे गोलमाल असल्याचा आरोप होत आहे. शहरातील काही बड्या लोकांच्या बांधकामांना अडथळा होऊ नये, यासाठी शाळेची भिंत पाडल्याचा आरोप नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केला आहे.

Web Title: Municipal Corporation demolished the fence wall of Takshila school