महापालिका ठेकेदार करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST2020-12-17T04:51:24+5:302020-12-17T04:51:24+5:30

सांगली : महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानातील कामांच्या जाहीर निविदा काढाव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महापालिका काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला आहे. ...

Municipal contractors will agitate | महापालिका ठेकेदार करणार आंदोलन

महापालिका ठेकेदार करणार आंदोलन

सांगली : महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानातील कामांच्या जाहीर निविदा काढाव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महापालिका काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला आहे. याबाबत संघटनेच्यावतीने उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.

स्वच्छ भारत अभियानातील कामे ठराविक मक्तेदारांना दिली जाणार असल्याचा आरोप होत आहे. याबाबत आयुक्तांना भेटून तक्रारी केल्या. आयुक्तांनी तीन लाखांपर्यंतच्या कामांची जाहीर निविदा काढण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले आहेत. पण अद्याप बांधकाम विभागाकडून या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. याबाबत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्याकडे चौकशी केली असता, कामांचे अंदाजपत्रक तयार केले जात असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांच्या आदेशानुसार येत्या चार दिवसांत या कामांच्या निविदा प्रसिद्ध न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुजीत काटे, साजीद शेख, आदित्य खांडेकर, आनंदा म्हारगुडे, प्रकाश नवलाई, रवींद्र सदामते, साजीदअली कुरेशी, वाहिद मानेखान, सिद्धार्थ कुदळे उपस्थित होते.

Web Title: Municipal contractors will agitate