इस्लामपुरात पालिकेच्या समिती निवडणुका बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:45+5:302021-01-13T05:07:45+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडीत अपेक्षेनुसार राष्ट्रवादी कॉँग्रेसने वर्चस्व ठेवले. राष्ट्रवादीने पाच समित्या ताब्यात ठेवल्या तर ...

इस्लामपुरात पालिकेच्या समिती निवडणुका बिनविरोध
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडीत अपेक्षेनुसार राष्ट्रवादी कॉँग्रेसने वर्चस्व ठेवले. राष्ट्रवादीने पाच समित्या ताब्यात ठेवल्या तर विकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेने एका सभापतिपदासह महिला बालकल्याणचे उपसभापतिपद मिळविले. या सर्व निवडी बिनविरोध झाल्या.
बांधकाम समितीच्या सभापतिपदावर सुनीता सपकाळ यांची वर्णी लागली तर स्थायी समितीवर राष्ट्रवादीकडून आनंदराव मलगुंडे, संजय कोरे यांची व विकास आघाडीकडून वैभव पवार यांना संधी मिळाली.
येथील पालिकेच्या सभागृहात तहसीलदार तथा पीठासन अधिकारी रवींद्र सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी करण्यात आल्या. सकाळच्या सत्रात दोन्ही बाजूंकडून नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. त्यांची छाननी व माघारीची वेळ संपल्यानंतर सायंकाळी तहसीलदार सबनीस यांनी निवडी जाहीर केल्या.
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी सुनीता संभाजी सपकाळ यांची निवड झाली. आरोग्य समिती सभापतिपदी विश्वनाथ डांगे, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी शहाजी पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी जयश्री हिंदुराव माळी आणि उपसभापतिपदी शिवसेनेच्या सीमा राजू पवार यांची निवड झाली. शिवसेनेच्या आनंदराव पवार यांच्याकडे शिक्षण समितीच्या सभापतिपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील नियोजन समितीचे पदसिद्ध सभापती झाले.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतील.
स्थायी समितीवर नव्याने आनंदराव मलगुंडे, संजय कोरे आणि वैभव पवार यांची निवड झाली. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांनी निवडणूक कामी सहायक अधिकारी म्हणून काम पाहिले.
फोटो - ११०१२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर पालिका न्यूज : इस्लामपूर नगरपालिकेतील नूतन सभापतींसोबत तहसीलदार रवींद्र सबनीस, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.