अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा स्वप्निल शहा प्रथम
By Admin | Updated: October 28, 2015 01:03 IST2015-10-28T01:03:34+5:302015-10-28T01:03:34+5:30
गेले तीन दिवस सुरू असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील ४६ स्पर्धक सहभागी झाले होते.

अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा स्वप्निल शहा प्रथम
कुरुंदवाड : येथील राष्ट्र सेवा दल यांच्यावतीने, उदय मंडळ यांच्या सहकार्याने आणि आॅल इंडिया चेस फौंडेशन फॉर दि ब्लार्इंड यांच्या मान्यतेने जैन सांस्कृतिक भवनात झालेल्या राज्यस्तरीय अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या स्वप्निल शहा याने प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय क्रमांक ठाणे येथील शिरीष पाटील यांनी मिळविला.
गेले तीन दिवस सुरू असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील ४६ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत अमित काकडे (पुणे) यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेनंतर सायंकाळी नगरपालिका चौकात नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या हस्ते व ‘दत्त साखर’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेत अतुल काकडे (सातारा) तिसरा, तर मिलिंद सामंत (पुणे) यांचा चतुर्थ क्रमांक आला. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. यावेळी वेटलिफ्टिंगमध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त चंद्रकांत माळी व स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या बाळकृष्ण चोरगे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष डांगे, गणपतराव पाटील, स्वप्निल शहा, हरीष पाटील यांची मनोगत व्यक्त केले. रावसाहेब पाटील, धनपाल आलासे, अमरसिंह पाटील, नगरसेवक शरद आलासे, दादासो पाटील, दीपक पोमाजे, जवाहर पाटील, तुकाराम पोवार, आदी उपस्थित होते. हेमंत डिग्रजे यांनी स्वागत केले. अभिजित पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)