शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील रेल्वे तिकिटांचा मिरजेतून काळाबाजार, दक्षता पथकाने एजंटास पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:24 IST

त्याच्या मोबाईलमध्ये सुमारे ५० हजार रुपयांच्या तत्काळ आरक्षित तिकिटांचा साठा आढळला.

मिरज : मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची तिकिटे मिरजेत काढली जात असल्याचे उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेच्यामुंबईतील दक्षता पथकाने मिरज रेल्वे स्थानकात तत्काळ आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीस शुक्रवारी रंगेहाथ पकडले. त्याच्या मोबाईलमध्ये सुमारे ५० हजार रुपयांच्या तत्काळ आरक्षित तिकिटांचा साठा आढळला.उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी आहे. या संधीचा फायदा घेत मिरज जंक्शन येथे आरक्षित तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने या गाड्यांची आरक्षण तिकिटे गेल्या काही महिन्यांपासून मिरजेतून काढण्यात येत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या दक्षता पथकास निदर्शनास आले.पथकाने शुक्रवारी सकाळी मिरज रेल्वे स्थानकात छापा टाकून आरक्षित तिकीट काउंटरवर आरक्षित तिकीट काढत असलेल्या एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. चौकशीत तो बऱ्याच दिवसांपासून अवैध मार्गाने आरक्षित तिकिटे काढून त्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले.दक्षता पथकाने आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात सुमारे ५० हजार रुपयांची आरक्षित तिकिटे आढळून आली. संबंधित एजंटाने काही दिवसांतच सुमारे लाख रुपयांच्या तिकिटांची विक्री केल्याचेही दिसून आले.संबंधित आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध मिरज रेल्वे सुरक्षा दलात गुन्हा नोंदवून त्याची सुटका करण्यात आली. या प्रकरणात मुंबई व मिरजेतील आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती दक्षता पथकाने दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Train Ticket Black Market Busted in Miraj; Agent Arrested

Web Summary : A minor was arrested in Miraj for black marketing Mumbai-bound train tickets. He possessed ₹50,000 worth of reserved tickets. Investigations are ongoing to uncover others involved in the racket.