शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Sangli: विट्यातील एमडी ड्रग्जचे मुंबई ‘कनेक्शन’ उघडकीस, मुंबईच्या दोघांसह वाळवा तालुक्यातील एकास अटक

By घनशाम नवाथे | Updated: February 3, 2025 14:27 IST

आर्थिक मदत कोणाची? ड्रग्ज कोणाला विकले? याचा तपास केला जाणार; आतापर्यंत सहाजणांना अटक

सांगली : विट्याजवळील कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचे मुंबई ‘कनेक्शन’ स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले. संशयित जितेंद्र शरद परमार (वय ४१, रा. नागडोंगरी, ता. अलिबाग, सध्या रा. ताहिर बेकरीच्यावर माहिम १६ मुंबई), अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख (वय ५३, रा. उस्मानिया मशिदजवळ, पाठणवाडी, फिल्डरवाडा, पवई, मुंबई) आणि सरदार उत्तम पाटील (वय ३४, रा. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली) या तिघांना अटक करण्यात आली.

या कारवाईबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, विटाजवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या रहुदिप बोरिचा (रा. कोसंबा, जि. सुरत) सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई), बलराज अमर कातारी (वय २४, रा. विटा) या तिघांना दि. २७ रोजी अटक करण्यात आली. त्यांनी बनवलेले २९ कोटी रूपयांचे १४ किलो ५०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यांनी तिघांची कसून चौकशी केली. तेव्हा आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली. या सहाजणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती.सहाजणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार रहुदिप याने दिल्ली येथून मशिनरी मागवली. सुलेमान शेख याने दिल्लीतील कंपनीस पैसे पाठवले. त्यानंतर दोघांनी बलराजच्या मदतीने विटा येथे मशिनरी बसवली. मशिनरी बसवण्यासाठी जितेंद्र याने आर्थिक मदत केली. सरदार पाटील याला ड्रग्ज विषयी माहिती असल्यामुळे त्याने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले. तर बलराज हा अब्दुलरज्जाक शेख याला पुणे, मुंबईत जाऊन माल देत होता. जितेंद्र, अब्दुलरज्जाक व सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आले.अधीक्षक घुगे म्हणाले, आतापर्यंत सहाजणांना अटक केली असून आणखी कोणाचा सहभाग आहे काय? त्यांना आर्थिक मदत कोणी केली? कच्चा माल कोण पुरवत होते? त्यांनी कार्वे येथून कोणाला ड्रग्ज विकले आहे काय? याचा तपास केला जाणार आहे. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुंबईतील ड्रग्जच्या गुन्ह्यात चौघांचा सहभागटोळीतील सुलेमान शेख, जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाख शेख आणि सरदार पाटील यांच्यावर २०१९ मध्ये एमडी ड्रग्जचे उत्पादन केल्याबद्दल मुंबईत काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या कारवाईवेळी २०० किलो एमडी ड्रग्ज पकडले होते. चौघेजण पाच वर्षे कारागृहात होते. तेथे रहुदिप बोरिचा, बलराज कातारी यांची ओळख झाली. तेव्हा त्यांनी एमडी ड्रग्ज कारखान्याची उभारणी करण्याचे ठरवले.

सरदार पाटीलला ड्रग्जची माहितीसरदार पाटील हा रसायनशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला माहिती होती. तसेच रहुदिप हा देखील रसायनशास्त्राचा पदवीधर आहे. कार्वे येथे तिघांनी ड्रग्जचा कारखाना उभारल्यानंतर सरदार पाटील यांने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले होते. ड्रग्ज उत्पादनाचा दोनवेळा प्रयत्न फसला होता.

पथके मुंबई, दिल्ली, गुजरातलाएमडी ड्रग्ज प्रकरणात वापरलेल्या मशिनरी व केमिकल्सचा तपास करण्यासाठी गुन्हे अन्वेषणची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. ही पथके मुंबई, दिल्ली व गुजरातकडे रवाना करण्यात आली आहेत. पथकाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस