सांगलीत एसटी चालकांची मुजोरी कायम; पुन्हा ‘वन वे’त एंन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:40+5:302021-09-18T04:27:40+5:30

सांगली : शहरातील प्रमुख चौकात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी एसटी बसेसना अन्य मार्गाने जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही अरूंद व ...

Muli of ST drivers in Sangli remains; One way entry again | सांगलीत एसटी चालकांची मुजोरी कायम; पुन्हा ‘वन वे’त एंन्ट्री

सांगलीत एसटी चालकांची मुजोरी कायम; पुन्हा ‘वन वे’त एंन्ट्री

सांगली : शहरातील प्रमुख चौकात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी एसटी बसेसना अन्य मार्गाने जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही अरूंद व एकेरी मार्ग असलेल्या रस्त्यावरच बस घालण्यात येत आहे. वाहतूक शाखेने गेल्या आठवड्यात बसवर कारवाई केली होती, तरीही अद्यापही बसचालकांची मुजोरी कायम असल्याने पटेल चौक, गणपती पेठ परिसरात वाहतूक कोंडी वाढत आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेली महापालिकेची इमारत पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. व इस्लामपूर, पुणेकडे जाणाऱ्या एसटी बसेसना जुन्या बुधगाव रोडवरून जाण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेच्या वतीने याबाबत एसटी महामंडळाला पत्रही दिले आहे. तरीही अनेक बसचालक पटेल चौक, गणपती पेठ, बुरूड गल्लीमार्गे बायपासकडे जात असल्याने या मार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. गेल्या आठवड्यात एकेरी मार्गाचे उल्लंघन केल्याबद्दल एक बस थेट पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा एकदा दोन बसचालकांनी या नियमांचा भंग केला. वाहतूक पोलिसांनी तातडीने जागेवरच त्यांना दंड केला. तरीही बसचालकांकडून नियमभंग सुरूच असल्याने आता पोलिसांकडून कडक पावले उचलण्यात येणार आहेत.

कोट

गणेशोत्सवामुळे शहरातील प्रमुख मार्गावर गर्दी आहे. त्यामुळे बसेसना मार्ग ठरवून दिला आहे. तरीही अनेक बसचालक मार्ग बदलून एकेरी मार्गात बस घालून वाहतूककोंडी करतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

प्रज्ञा देशमुख, सहा. निरीक्षक, वाहतूक शाखा.

Web Title: Muli of ST drivers in Sangli remains; One way entry again