खासदार जिल्हा परिषदेत बदल घडवु शकतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:46+5:302021-04-05T04:23:46+5:30
सांगली महानगरपालिकेमध्ये ‘करेक्ट’ कार्यक्रम केल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांचे आता जिल्हा परिषदेत लक्ष असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, मंत्री ...

खासदार जिल्हा परिषदेत बदल घडवु शकतात
सांगली महानगरपालिकेमध्ये ‘करेक्ट’ कार्यक्रम केल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांचे आता जिल्हा परिषदेत लक्ष असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, मंत्री पाटील याबाबत उघडपणे काहीही बोलण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर विटा येथे रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी मंत्री पाटील यांनी सांगली महापालिका महापौर निवडीवेळी मला कोरोना झाला होता. त्यामुळे त्या सत्तांतरात माझा काहीही रोल नाही, असे मी यापूर्वी सांगितले होते. आता जिल्हा परिषदेच्या वेळी परत कोरोना होऊ नये म्हणजे मिळवली, अशी गुगली टाकली.
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार आग्रही आहेत. सातत्याने बैठका घेत आहेत. याबाबत पाटील म्हणाले, ‘खासदार आपल्या मनाप्रमाणे सभापती, अध्यक्ष निवडणार असतील, तर ते तसे बदल करू शकतील. आपण त्यांना मदत करू.’