शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाका खासदार कोणत्या पक्षाचे?, तालुकाध्यक्षांचा सवाल; जतमध्ये भाजपअंतर्गत वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:37 IST

जत तालुक्यातील भाजपची पाळेमुळे रोखण्याचे काम खासदार संजयकाका पाटील करीत आहेत

जत : जत तालुक्यातील भाजपची पाळेमुळे रोखण्याचे काम खासदार संजयकाका पाटील करीत आहेत. ते भाजपचे खासदार आहेत की काँग्रेस, राष्ट्रवादीचे, असा सवाल भाजपचे जत तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. दोन दिवसांपासून जतमध्ये भाजपअंतर्गत राजकारण पेटले आहे.पत्रकात सावंत यांनी म्हटले आहे की, बीट हवालदारांची मदत घेऊन मागील विधानसभेला खासदारांनी जगताप यांना पराभूत करण्याचे पाप केले. आताही त्यांचे तेच उद्योग सुरू आहेत. पण, असले धंदे भाजप कार्यकर्ते चालू देणार नाहीत. २० डिसेंबरला खासदार संजयकाका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थित झाले. पाटील हे भाजपचे खासदार आहेत की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे, अशी शंका निर्माण झाली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपशी बेइमानी केलेल्या सर्व बीट हवालदारांची फौज संजयकाका पाटील घेऊन कार्यक्रम करत फिरत आहेत. आमचे नेते विलासराव जगताप यांनी खासदारकीच्या दोन्ही निवडणुकांत तिकिटापासून प्रचारापर्यंत त्यांचा प्रचार केला. कोणत्याही पक्षाशी निष्ठा नसलेल्या सत्तापिपासू माणसांना व राष्ट्रवादीची टीम घेऊन संजयकाकांनी जत तालुक्यातील भाजपची पाळेमुळे रोखण्याचे काम सुरू केले आहे.फितुरांची टीम बरोबर घेऊन निवडणुका आल्याचे सांगत जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याचे त्यांचे नाटक आहे. पक्षाला विरोध करणारे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपशब्द बोलणाऱ्या लोकांना घेऊन खासदार फिरत आहेत. जिल्हा भाजपच्या नेत्यांनी याची नोंद घ्यावी, अशी आमची मागणी आहे.वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणारखासदार पाटील यांनी केलेल्या पक्षाच्या विरोधातील गोष्टी व अन्य बाबींसंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे तक्रार करणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणjat-acजाटBJPभाजपा