शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आयर्विनला पर्यायी पुलासाठी जागा बदलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:11 IST

सांगली शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलण्याबाबत शासनपातळीवर चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरच जागा बदलायची की आहे तिथेच पूल उभारायचा, याचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देआयर्विनला पर्यायी पुलासाठी जागा बदलण्याच्या हालचालीनिवृत्त अधिकाऱ्यांसोबत मंत्री पाटील बैठक घेणार

सांगली : शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलण्याबाबत शासनपातळीवर चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरच जागा बदलायची की आहे तिथेच पूल उभारायचा, याचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.आयर्विनच्या पर्यायी पुलावरून संघर्ष निर्माण झाला आहे. या पुलाला व्यापारी, नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. सांगलीवाडीच्या नागरिकांचाही पुलाला विरोध आहे. आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाल्याने पर्यायी पुलाची मागणी होत होती.

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पाठपुरावा करून पुलाला २५ कोटीचा निधी मंजूर करून आणला होता. मध्यंतरी सांगलीवाडीच्या नागरिकांनी पुलाचे काम बंद पाडले होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा पुलाचे काम सुरू करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीतही पुलाच्या जागेवरून बराच वाद झाला. अखेर मंत्री पाटील यांनी स्थळ पाहणीनंतर निर्णय घेण्याची ग्वाही दिली. आता पुलाची जागा बदलण्याची चाचपणी सुरू झाली आहे.

नागरिक, व्यापाऱ्यांचा विरोध असेल तर पूल अन्यत्र स्थलांतर करता येतो का? हे तपासले जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याचे समजते. लवकरच या निवृत्त अधिकाऱ्यांसोबत मंत्री पाटील बैठकही घेणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील