बाजार समितीत नोकरभरतीवरील बंदी उठविण्यासाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:46+5:302021-02-09T04:29:46+5:30
बाजार समिती येथे कनिष्ठ लिपिक, संगणक चालक, टायपिस्ट, अंतर्गत तपासनीस, सेसलिपीक, चपरासी- रखवालदार पदांच्या २६ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज ...

बाजार समितीत नोकरभरतीवरील बंदी उठविण्यासाठी हालचाली
बाजार समिती येथे कनिष्ठ लिपिक, संगणक चालक, टायपिस्ट, अंतर्गत तपासनीस, सेसलिपीक, चपरासी- रखवालदार पदांच्या २६ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा होता. दि. २० जूनपर्यंत अर्ज दाखल केले होते. परीक्षेवेळी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली होती. याचवेळी मिरज तालुका युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद पाटील यांनी बाजार समितीच्या नोकरभरतीला स्थगिती देण्यासाठी पणन संचालक आणि पणनमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पणन संचालकांनी बाजार समितीच्या नोकरभरतीला स्थगिती दिली होती.
आता बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे अहवाल सादर केला आहे. यावर निर्णय घेऊन नोकरभरतीवरील बंदी उठविण्याची मागणी सभापती पाटील यांनी केली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे चर्चा करण्यासाठी सभापती पाटील मंगळवारी जाणार आहेत. तोडगा न निघाल्यास राज्य शासनाकडे जाणार आहेत. सभापती पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे पणनमंत्री बाळासाहेब पाटील नोकरभरतीवरील बंदी उठविणार का, यावर चर्चा सुरू आहे.