कुमठे येथे वडर कुटुंबीयांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:18+5:302021-06-25T04:20:18+5:30
कवठे एकंद : कुमठे (ता. तासगाव) येथील सिटी सर्व्हे क्र. ५०७ जागेवर दिवाणी न्यायालयाच्या हुकुमाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी, या ...

कुमठे येथे वडर कुटुंबीयांचे आंदोलन
कवठे एकंद : कुमठे (ता. तासगाव) येथील सिटी सर्व्हे क्र. ५०७ जागेवर दिवाणी न्यायालयाच्या हुकुमाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी गुरुवारपासून वडर कुटुंबीयाने बेमुदत उपोषण सुरू केले.
कुमठे येथील संजय राजाराम वडर यांनी सिटी सर्व्हे क्रमांक ५०७ या जागेवर तासगाव दिवाणी न्यायालयाने हुकूमनामा क्रमांक १६४/१३ सप्टेंबर १९७३ प्रमाणे अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी कुमठे येथे संजय राजाराम वडर, अजय संजय वडर, धनराज दगडू वडर व सचिन वडर कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले. सिटी सर्व्हेला चुकीची नोंद केली असून, सदर जागेबाबत न्यायालयाच्या हुकूमनामाप्रमाणे नोंद व्हावी, अशी मागणी असल्याचे संजय वडर यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी सरपंच महेश पाटील, पोलीस प्रशासनाने भेट दिली.