सांगलीत उंटावरून शेळ्या राखत दलित महासंघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:59+5:302021-06-26T04:19:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील शासकीय रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने उंटावरुन शेळ्या राखत अनोखे आंदोलन करण्यात ...

Movement of Dalit Federation keeping goats on camels in Sangli | सांगलीत उंटावरून शेळ्या राखत दलित महासंघाचे आंदोलन

सांगलीत उंटावरून शेळ्या राखत दलित महासंघाचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : येथील शासकीय रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने उंटावरुन शेळ्या राखत अनोखे आंदोलन करण्यात आले. रुग्णालयाचा सध्या सुरू असलेला कारभार हा उंटावरून शेळी राखण्याचा प्रकार असल्याने थेट उंट आणि शेळी घेऊनच त्याचा निषेध केल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. सांगलीतील शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांसाठी वरदान असलेतरी तेथील कारभारामुळे अनेकदा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असतानाही रुग्णालयांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नाही, इतर वैद्यकीय सुविधाही रुग्णालयात नाही. या गंभीर प्रकाराकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे एकूणच रुग्णालयाचा कारभार म्हणजे उंटावरून शेळ्या राखण्याचा सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दलित महासंघाचे उत्तम मोहित यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Movement of Dalit Federation keeping goats on camels in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.