प्रकाश हॉस्पिटलमध्ये काळ्या फिती लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:20 IST2021-05-29T04:20:30+5:302021-05-29T04:20:30+5:30

इस्लामपूर : प्रकाश हॉस्पिटलवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीवर कामगार संघटना ठाम आहे. मात्र, ...

Movement with black ribbons at Prakash Hospital | प्रकाश हॉस्पिटलमध्ये काळ्या फिती लावून आंदोलन

प्रकाश हॉस्पिटलमध्ये काळ्या फिती लावून आंदोलन

इस्लामपूर : प्रकाश हॉस्पिटलवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीवर कामगार संघटना ठाम आहे. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी काम बंद आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कामगार संघटनेने काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध नोंदवायला सुरुवात केली.

कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजित पाटील, सचिव कुलदीप खांबे, सुजित पाटील, हिम्मत जाफळे, योगेश लोळगे, शंकर कुटे, विनायक भालेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहेत. मात्र, हॉस्पिटल विरोधात निनावी तक्रारी करणे, रुग्णांच्या नातेवाइकांची दिशाभूल करुन खोटे गुन्हे दाखल करणे खेदजनक आहे. हे गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत न्याय मिळविण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

फोटो : २८०५२०२१-आयएसएलएम-प्रकाश हॉस्पिटल न्यूज : इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध केला.

Web Title: Movement with black ribbons at Prakash Hospital