मोटारसायकलींची धडक; आरवडेजवळ एक जागीच ठार
By Admin | Updated: October 31, 2015 23:59 IST2015-10-31T23:51:54+5:302015-10-31T23:59:03+5:30
दोघे गंभीर जखमी

मोटारसायकलींची धडक; आरवडेजवळ एक जागीच ठार
तासगाव : आरवडे(ता. तासगाव) येथील रामबागजवळ दोन माटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात राजेंद्र बाबासाहेब वाघ (वय ३५, रा. आरवडे) हा जागीच ठार झाला, तर
योगेश पाटील (रा. ढवळी) आणि शुभम मोहिते (रा. मांजर्डे) हे दोघे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्यादरम्यान झाला.
याबाबत तासगाव पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, राजेंद्र पाटील हे शेतात पाणी पाजून मोटारसायकल (क्र. एमएच १० एवाय ८९५८) वरुन परतत असताना, योगेश पाटील आणि शुभम मोहिते मोटारसायकलवरुन (क्र. एमएच १० व्हीबी ८६२४) मांजर्डेला निघाले होते. रामबागजवळ या दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात राजेंद्र वाघ यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.