सांगलीत जावयाकडून सासूवर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST2021-04-18T04:24:50+5:302021-04-18T04:24:50+5:30
सांगली : शहरातील मोती चौक परिसरात जावयाने सासूवर कोयत्याने हल्ला केला. यात सासू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ...

सांगलीत जावयाकडून सासूवर कोयत्याने हल्ला
सांगली : शहरातील मोती चौक परिसरात जावयाने सासूवर कोयत्याने हल्ला केला. यात सासू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सुनिता सुधीर शिंदे (वय २०) हिने पती सुधीर बाळासाहेब शिंदे (वय २६, रा. काशीपुरा गल्ली, तासगाव) यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार, १६ रोजी फिर्यादी सुनिता ही आई व राणी पाटील यांच्यासमवेत जात होती. मोती चौक परिसरातील मारुती मंदिराजवळ त्या आल्या असता सुनिताचा पती सुधीर पाठीमागून आला व त्याने सासूवर कोयत्याने हल्ला केला. डोक्यात वार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सुनिता हिने पतीविरोधात फिर्याद दाखल केली. कौटुंबिक कारणावरून त्याने वार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.