शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मुलाला स्थळ पहायला गेले अन् जीवावर बेतले; डंपरच्या धडकेत आई जागीच ठार, वडील गंभीर जखमी

By अशोक डोंबाळे | Updated: May 2, 2024 17:24 IST

दरीबडची : मुलासाठी स्थळ पाहून गुड्डापूरहून (ता. जत) धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे दुचाकी (क्र. एम. एच १० डी ए ...

दरीबडची : मुलासाठी स्थळ पाहून गुड्डापूरहून (ता. जत) धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे दुचाकी (क्र. एम. एच १० डी ए ४५३९) वरून निघालेल्या माजी सैनिक गणपती माने यांच्या दुचाकीस सोरडी साठवण तलावाकडे मोकळा भरधाव निघालेल्या डंपरने (क्र. के.ए ५०,बी २४९४) पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेल्या मंदा गणपती माने (वय ५५,रा धुळगाव,ता.कवठेमहांकाळ) या महिलेचा डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गणपती माने गंभीर जखमी झाले.ही घटना आज, गुरुवारी सकाळी गुड्डापूर रस्त्यावरील कदम वस्तीजवळ घडली. जखमी गणपती माने यांच्या चेहरा, डोक्याला मार लागला आहे. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धुळगाव येथील माजी सैनिक गणपती माने व पत्नी मंदा माने हे दांपत्य दुचाकीवरून मुलाला सकाळी मुलगी पाहण्यासाठी जत पूर्वभागातील गुड्डापूर येथे गेले होते. मुलगी बघून परतत असताना सोरडी साठवण तलावातील सकाळी माती भरुन गेलेला डंपर हा गुड्डापूर येथे माती ओतून मोकळा सोरडी साठवण तलावाकडे येत होता. या भरधाव डंपरने कदम वस्तीजवळ आल्यावर दुचाकीस मागून जोराची धडक दिली.या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या मंदा माने रस्त्यावर उडून पडल्या. त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेले. डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. मेंदू रस्त्यावर पडला होता. डंपर धडक देवून ४०० मीटर अंतरावर जाऊन थांबला चालक डंपर थांबवून पळून गेला. या घटनेची माहिती जत पोलीस ठाण्याला दिली.तर दुसरीकडे दुचाकीस्वार गणपती माने यांच्या चेहरा, डोक्याला मार लागला आहे. हाताचा खुबा, पाय फँक्चर झाला आहे. अपघात झाल्यानंतर बराच वेळ जखमी रस्त्यावर पडून होते. दरम्यान, ह.भ.प तुकाराम बाबा जतला निघाले होते. त्यांनी जखमीला गाडीतून उपचारासाठी माडग्याळला घेऊन गेले. प्राथमिक उपचार करुन सांगलीला पाठविले. सध्या सांगलीमध्ये उपचार सुरू आहेत.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू