शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: खेळता-खेळता चिमुकला तळ्यात पडला, वाचविण्यासाठी आई धावली; दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 11:55 IST

ताडपत्री शेवाळली असल्याने त्या पाण्यातच घसरत राहिल्या

जत : शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलनगरातील आदाटे वस्तीजवळील शेत तळ्यात आई व मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. मीनाक्षी चंद्रकांत माने (वय २७) व आलोक चंद्रकांत माने (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. जत पोलिस ठाण्यात याबाबत उशिरा नोंद झाली.पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विठ्ठलनगरातील आदाटे वस्तीजवळ माने कुटुंबाचे घर आणि शेती आहे. माने यांच्या घरासमोरच शेततळे आहे. शेततळे सध्या भरले असून त्यातील पाणी शेवाळलेले आहे. दुपारच्या सुमारास तीन वर्षांचा चिमुकला आलोक हा खेळत-खेळत तळ्याकडे गेला. घरात त्याची आई होती. खेळता-खेळता आलोक तळ्यात पडल्याचे लक्षात येताच घरात कोणीही पुरुष माणूस नसल्याने आई मीनाक्षी या त्याला वाचविण्यासाठी धावल्या.

त्या तलावात उतरल्या. मात्र बाहेर पडण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली. ताडपत्री शेवाळली असल्याने त्या पाण्यातच घसरत राहिल्या. आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीच मदतीला आले नाही. त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.सायंकाळी माने यांच्या कुटुंबातील इतर लोक घराकडे आले. मीनाक्षी व आलोक कोठेच दिसले नसल्याने त्यांचा शोध घेताना साडेपाच वाजता मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. जत पोलिसांना याची माहिती दिली. हा प्रकार समजताच नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणले.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू